Ativrushti Anudan बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ativrushti Anudan अतिवृष्टी अनुदान बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया.

राज्यात सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील लाखों शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई म्हणून राज्य शासणे निधी वितरित केला होता.

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली आहे परंतु राज्यातील काही शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही.

त्यांच्यासाठी आता राज्य शासनाने 280 कोटी रुपयाचा निधी वितरित केला आहे या निधीचे वितरण सुरू झाले आहे.

अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे त्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा देखील झाली आहे.

Also Read This Rooftop Solar Yojana online application

Ativrushti Anudan बँक खात्यात जमा झाले का करा चेक

सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखों शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने 410 कोटी अनुदान मंजूर केले होते.

मात्र ऑनलाइन सॉफ्टवेअर मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे अतिवृष्टीचे 410 कोटी अडकले होते.

त्यानंतर 21 मार्च पासून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान जलद गतीने मिळावे यासाठी राज्य शासनाने महा आयटी द्वारे ऑनलाइन प्रणाली विकसित केली होती.

मात्र या ऑनलाइन प्रणाली द्वारे अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे आता पर्यंत ते 410 कोटी अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले नाही.

मुंबईच्या मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या नुकत्याच मागवून घेतल्या होत्या या याद्या मागवून महिना झाला होता.

परंतु अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते.

आता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

280 कोटी अनुदान झाले खात्यात जमा

बीड जिल्ह्यातील परळी, माजलगाव, केज, गेवराई, धारूड, बीड, आंबाजोगाई व आष्टी या आठ तालुक्यातील 2 लाख 51 हजार 399 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जवळपास 280 कोटी अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खत्यावरही अनुदान लवकरच जमा होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक करून घातले नसेल त्यांनी तत्काळ आधार लिंक करून घ्यावे.

तसेच बँक खात्यावर अनुदान जमा झाले आहे की नाही याची सर्व शतकाऱ्यांनी पडताळणी करून घ्यावी.

अधिक महतीसाठी बातमी वाचा

Leave a comment