Pm Kisan Yojana या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये हप्ता दिला जातो आता यात पुन्हा एका नवीन योजनेचा समावेश करण्यात आला आहे.
ही नवीन योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे.
पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 असे मिळून शेतकारींना एकूण 4000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे.
आता शेतकऱ्यांना लवकरच या दोन्ही योजनाचा लाभ मिळणार आहे कारण आता पैसे वितरित करण्याची तारीख शासनाने फिक्स केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आता मे महिन्यात म्हणजेच पुढील महिन्यात या दोन्ही योजनाचा लाभ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती खाली जाणून घेऊया.
Pm Kisan Yojana या तारखेला मिळणार शेतकऱ्यांना पैसे
PM Kisan Yojana शेती व्यवसायाचा सन्मान म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेची अंमलबजावणी राजाकडूनही करण्यात येईल.
अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 फेब्रुवारीला केली होती.
या योजनेचा लाभ कसा असेल हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
शेतकरी बांधवांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना केंद्र सरकारच्या निकषांनुसारच राबवावी,
अशी शिफारस कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्याला केली आहे.
परिणामी केंद्र सरकारच्या तेराव्या हप्त्यानुसार 81 ला 38 हजार 191 शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळतील. शेतकऱ्यांना हे 4000 रुपये आता मे महिन्याच्या कोणत्याही तारखेला मिळू शकतात.
नमो शेतकरी योजनेत आता 81 लाख लाभार्थी
प्राप्तिकर भरणारे परंतु नावावर शेती असलेले, सरकारी अधिकारी व कर्मचारी अशांना या यादीतून वगळण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होत आहेत अशा खात्यांना आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नुकताच या योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या नावावर जमा केला.
योजनेत राज्यात आता केवळ 81 लाख 38 हजार 198 शेतकरी प्राप्त ठरले आहेत.
केंद्र सरकारकडून योजनेच्या एप्रिल ते जुलै या कालावधीत चौदावा हप्ता मे मध्ये देण्यात येणार आहे.
या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे,बँक खाते आधार क्रमांक जोडणे व ई केवायसी प्रमाणे करण करणे आदीबाबींची पूर्तता 30 एप्रिल पूर्वी करावी.