Heavy Rain Alert राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यामध्ये गारपीठीसह अवकळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यात कमाल तपमानांचा पारा हळू हळू वाढत चालला आहे यातच वादळी पावसाचे संकट कायम असल्याने ढगाळ हवामान होत आहे.
आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिठीसाह अवकळी पावसाची शक्यता आहे.
त्याच प्रमाणे तशी 30 ते 40 किलो मीटर प्रती वेगाने वारे वाहून मेघगर्जणा आणि विजासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Heavy Rain Alert राज्यात पावसाला मिळत आहे पोषक हवामान
राज्यात पावसाळा पोषक हवामान होत असतानाच, ढगाळ वातावरण आणि उकड्यात वाढ होत आहे यातच राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार होत आहे.
मागील 24 तासामध्ये जळगाव येथील उच्चांक 36 अंश सेल्सिअस तपमानची नोंद झाली.
राज्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये गारपिठीसह अवकळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात 31 ते 36 अंशाच्या दरम्यान आहे. तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशापासून मारठवडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून 1.5 किलो मीटर उंचीवर हवेचा कमी दाबचा पट्टा व अखंडित वाऱ्याची स्थिति आहे.
कर्नाटक आणि तामिळनाडू परीसरासह छत्तीसगड परिसरावरही चक्रवार वाऱ्याची स्थिति तयार झाली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत
बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात शनिवार पर्यंत चक्रवार वाऱ्याची स्थिति तयार होण्याची शक्यता आहे या प्राणलीच्या प्रभावामुळे या भागात शनिवार पर्यंत कमी दाबचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
या प्रणालीची तीव्रता वाढून उपसागरात चक्रीवादळ येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे ही वादळी प्रणाली उत्तरेकडे सारकण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यामध्ये गारपीठीसह अवकळी पाऊस ( यलो अलर्ट )
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मारठवडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, धारशिव , लातूर
विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा नागपूर, भंडारा, गोंदिया यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली.
राज्यातील या जिल्ह्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.