Monsoon Update राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामध्ये काही जिल्ह्यात तर यलो अलर्ट सुद्धा जरी करण्यात आला आहे या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यात पुढील चार दिवस संपूर्ण देशात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
कोकण, मध्य महाराष्ट्रात २७ ते ३० जून तर विदर्भाला मंगळवारी २७ रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान सोमवारी मान्सूनचे गुजरात, राज्यस्थान व कश्मीर भागात प्रगती झाली पुढील ४८ तासात मान्सून शंभर टक्के देश व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, महाराष्ट्रा ते केरळ किनारपट्टी या भागात चक्रीय स्थिती व कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मान्सूनला अनुकूल स्थती निर्माण झाली आहे.
त्यामुळे मान्सून प्रचंड वेगळे पुढे जात आहे सोमवारी तो गुजरात, राज्यस्थान व जम्मू काश्मीरच्या काही भागात पोहचला
पुढील ४८ तासात तो संपूर्ण देश व्यापणार आहे. असे हवामान विभागाने सांगितले आहे.
Monsoon Update राज्यात अतिवृष्टीचा इशारा शेतकऱ्यांनी सतर्क राहावे
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा व अरबी समुद्रात वाऱ्याची चक्रीय स्थती निर्माण झाल्याने महाराष्ट्र, केरळ किनारपट्टीला आगामी पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग तशी ५५ ते ७५ किलोमीटर इतका वाढत असल्याने
कोकण व मध्य महाराष्ट्राला २७ ते ३० जून पर्यंत अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भाला २७ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील अनेक भागात चांगल्या चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करण्यास सुरवात केली आहे
तर अजूनही बऱ्याच भागात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही.
अशा भागातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता पावसाची वाट पहावी असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
२४ राज्यात जोरदार पाऊस होणार
महाराष्ट्रासह देशातील २४ राज्यामध्ये मंगळवारी व बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने सोमवारी हा अंदाज वर्तविला आहे.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आसाम, मेघायल या राज्यासह संपूर्ण देशात जोरदार पाऊस सुरु होणार आहे.
दुसरीकडे गेल्या २४ तासातील पावसामुळे पाच राज्यातील घडलेल्या विविध घटनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे
राज्यस्थानमध्ये ठिकठिकाणी विजा कोसळल्याने ४ जन मरण पावले आहे.
मुंबईत दोन इमारतीच्या पडझाडीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर विजेच्या खांबाचा धक्का लागून महिलेला जीव गमवावा लागला.