Pik vima arj 2023 खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु

शेतकरी बंधुंनो खरीप पिक विमा ऑनलाईन अर्ज pik vima arj 2023 भरण्यास सुरुवात झालेली आहे.

आता शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात विमा भारता येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

तुमच्या पिकांचे नैसर्गिक अप्पतीमुळे काही नुकसान झाले तर तुम्हाला पिक विमा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या पिकांचा पिक विमा लवकरात लवकर काढून घ्या.

त्यासाठी 1 जुलै २०२३ पासून ऑनलाईन अर्ज करणे सुरु झाले आहे शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी आता फक्त एका पिकासाठी एक रुपया भरावा लागणार आहे .

त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा काढणे आवश्यक आहे तुम्ही पिक विमा कसा भरू शकता या संदर्भात माहिती खाली पाहूया.

हे देखील वाचा : ठिबक अनुदान योजना 90 टक्के मिळणर अनुदान करा अर्ज

pik vima arj 2023 अर्ज शेवटच्या तारखेच्या आधीच भरा

शेवटच्या तारखेच्या दिवशी अनेक शेतकरी पिक विमा काढण्यासाठी csc सेंटरवर गर्दी करतात.

पिक विमा अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसी तुम्ही csc सेंटरवर गेलात तर अशावेळी

त्या ठिकाणी गर्दी तर असतेच शिवाय शेवट दिनांक असल्यामुळे तुम्ही पिक विमा योजनेचा अर्ज भरण्यापासून वंचित राहू शकता.

शेतकरी बंधुंनो पिक विमा अर्ज करण्यासाठी दोन पद्धती असतात.

पहिली पद्धत म्हणजे csc सेंटरवर जावून आपल्या पिकांचा पिक विमा अर्ज करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे स्वतः पिक विमा अर्ज सादर करणे होय.

पिकपेरा फॉर्म डाउनलोड करा

Pik vima arj 2023 पिक विमा अर्ज तुम्ही स्वतः भरा किंवा csc सेंटरवर जा

पिक विमा ऑनलाईन अर्ज अचूक सादर करण्यासाठी शक्यतो जवळच्या सीएससी सेंटरवर शेतकऱ्यांनी जावे. CSC सेंटरवरील जे VLE असतात ते अगदी अचूकपणे शेतकऱ्यांचा पिक विमा ऑनलाईन अर्ज सादर करून देवू शकता.

यासाठी मात्र त्यांना पिक विमा रकमे व्यतिरिक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी काही शुल्क द्यावे लागतात.

पंरतु आता तसेही तुम्हाला एका रुपयात पिक विमा भरून मिळणार आहे

त्यामुळे csc सेंटर वाले एवढे पैसे घेणार नाही त्यामुळे तुम्ही csc सेंटरवर जाणून विमा भरला तर चांगले राहील.

तुम्ही जर सुशिक्षित शेतकरी असाल किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये एखादी सुशिक्षित व्यक्ती असेल तर ते देखील त्यांचा ऑनलाईन पिक विमा अर्ज अगदी त्यांच्या मोबाईलवरून सादर करू शकतात.

अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामध्ये कामे असतात शिवाय काही शेतकरी शेतात राहत असल्याने त्यांना सीएससी सेंटरवर जाण्यास वेळ नसतो.

अशावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील पिक विमा अर्ज pik vima arj 2023 नोंदणी करू शकता.

पिक विमा ऑनलाईन अर्ज लिंक

Leave a comment