नुकसानभरपाई आली या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा यादी

नुकसानभरपाई आली पहा संपूर्ण माहिती.

जून व जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे या पावसामुळे शेतजमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असून या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.

ज्या शेतकरी बांधवाना हि नुकसान भरपाई मिळणार आहे त्या जिल्ह्याची यादी आणि किती निधी मिळणार आहे या संदर्भातील माहिती देखील या जी आर सोबत जोडलेली आहे. हि यादी तुम्ही बघू शकता. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

नुकसानभरपाई आली 1071 कोटी 77 लाख निधी मंजूर

अतिवृष्टी असेल किंवा पूर असेल किंवा चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले तर पुढील हंगामामध्ये उपयोगी पडेल असे शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येते.

अमरावती व औरंगाबाद म्हणजेच संभाजी नगर यांच्याकडून जून ते जुलै 2023 या महिन्यात अतिवृष्टी व पुर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या व शेतजमीच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला होता. शेती पिकांच्या वर्षात जमिनीच्या नुकसानीसाठी एकूण 1071 कोटी 77 लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

या संदर्भातील जी आर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता हा निधी किती आणि कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे तर ती यादी अशी आहे.

11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि नुकसानभरपाई मिळणार असून ती यादी अशी आहे.

अमरावती.

अकोला.

यवतमाळ.

बुलढाणा.

वाशीम.

जालना.

परभणी.

हिंगोली.

नांदेड.

बीड.

लातूर.

यादीत तुमचे नाव पहा

Leave a comment