today bhaav कापूस ,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कापूस पिकाचे दर १२००० तर सोयाबीन पिकाचे दर ९००० हजार होण्याचे संकेत आहे.
त्या संदर्भात माहिती या आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत व आज बाजारात सोयाबीन आणि कापूस पिकला किती दर मिळत आहे याची माहिती जाणून घेऊया. today bhaav
कपाशी या पिकाचे हमी बाजार भाव 12000 हजार रुपये तर सोयाबीन या पिकाचे बाजार भाव 9000 रुपये करा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारकडे केली आहे. या संदर्भात अजून जाणून घ्यायचे झाले तर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळावा तसेच पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.
अशा विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण बीड येथे सुरू केले होते, परंतु या उपोषणाला सरकारने फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आक्रमक झाले आणि थेट मुंबई येथे सरकारची भेट घेण्यासाठी गेले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सहकार्य आणि शेतकरी वर्ग सुद्धा मुंबई येथे सरकार दरबारी गेला होता.
सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना भेटले, रविकांत तुपकर यांनी आपल्या सर्व मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्या असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून 15 दिवसाचा वेळ मागून घेतलेला आहे.
या 15 दिवसात सरकार निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव देईल असे आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविकांत तुपकर यांना दिले आहे, त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांकडे कापूस तसेच सोयाबीन अजून साठवून ठेवलेला असेल अशा सर्व शेतकरी मित्रांनी अजून दहा ते पंधरा दिवस आपले पीक विकू नये. कारण सरकारने निर्णय दिला तर कापूस आणि सोयाबीन या पिकाचे बाजार भाव वाढणार आहे.
शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या मागणीनुसार कापूस या पिकाला 12000 हजार रुपये हमीभाव तर सोयाबीन या पिकाला 9000 हजार रुपये हमीभाव द्यावा. जर याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.