नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता जाहीर यादिवशी जमा होणार शेतकऱ्यांना २००० पहा यादी

नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु.देण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता राज्यातील तब्बल ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता आणि त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा दुसरा हफ्ता कधी येणार याची वाट राज्यातील

महाराष्ट्र राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठीची सर्वात मोठी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.पीएम किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु.देण्याची घोषणा केली होती आणि या योजनेसाठी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना नव्याने अर्ज करणे ची आवश्यकता नव्हती.ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे मिळतात अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दुसरा हफ्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे कारण आपण पाहत आहे राज्यातील दुष्काळाने अडचणीत होता त्यातून कसतरी बाहेर निघत असतानाच राज्यातील तब्बल 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे आणि त्यामुळे हा कोलमडून पडला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हफ्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

हा हफ्ता शेतकऱ्यांना आधार कार्डला जे बँक खाते लिंक आहे त्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत थेट २००० रु.जमा करण्यात येणार आहेत.ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नमो शेतकरी फॉर्म भरला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज भरून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.या योजनेच्या अटी व पात्रता खाली देण्यात आल्या आहेत.

Leave a comment