maharashtra dushkal राज्य शासनाने गेल्या काही दिवसात ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता त्यात पुन्हा काही नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता.
राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला परंतु शासन त्या संदर्भात उपयायोजना करता नाही दिसत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी अजून देखील अनुदानापासून वंचित आहे.
मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. शासन आणि प्रशासनात याबाबत समन्वयाचा अभाव आहे. शेतकऱ्यांकडून कर्जवसुली, थकीत बीजबिलांसाठी शेतीपंपांचे वीजेचे जोड तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. maharashtra dushkal
रेसा पाऊस नाही, खरिपाची पिके गेली, रब्बीत तर अनेक गावांत पेरणीच झाली नाही. यामुळे शेतकरी हतबल आहे. शासनाने राज्यात ३१ आक्टोबरला १५ जिल्ह्यांतील २४ तालुक्यांत तीव्र तर १६ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर केला आहे.
त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी नव्याने अध्यादेश काढून २७ जिल्ह्यांतील २०२१ मंडले दुष्काळ सदृश म्हणून जाहीर केली. दुष्काळ आणि दुष्काळसदृष्ट असे असले तरी दोन्ही गावांत आठ प्रकारच्या सवलती मिळणार असल्याचे आणि त्या तातडीने लागू करणार असल्याचे जाहीर केले. मात्र उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झालेली नाही maharashtra dushkal
दुष्काळग्रस्तांना मिळणाऱ्या सवलती
- जमीन महसुलात सूट,
- पीक कर्जाचे पुनर्गठन,
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषिपंपांच्या चालु बिलात ३३.५ टक्के सूट
- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी
- रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक ठिकाणी पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर
- शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे