या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई nuksan bharpai yojana

nuksan bharpai yojana 11 जिल्ह्यांतील 14 लाख शेतकरी मित्रांसाठी भरपाई मदत मंजूर केली आहे. आणि ही भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार? हे देखील आपण आज या बातमीत जाणून घेणार आहोत. जून आणि जुलै 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी झाली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांची नुकसानभरपाई मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 1 हजार 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मित्रांनो, या मदतीसाठी, चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन केले जाईल. तसेच, राज्य शासनाच्या अंतर्गत जाहीर केलेली नैसर्गिक आपत्ती असल्यास, विभागात 24 तासांत 65 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, विभागातील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे. nuksan bharpai yojana

यादी पहा

 1. अमरावती
 2. अकोला
 3. यवतमाळ
 4. बुलढाणा
 5. वाशीम
 6. जालना
 7. परभणी
 8. हिंगोली
 9. नांदेड
 10. लातूर
 11. बीड

या 11 जिल्ह्यांतील 14 लाख 9 हजार 318 शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे. या शेतकरी बंधू-भगिनींच्या खात्यात ही भरपाई मदत रक्कम DBT द्वारे जमा केली जाईल.

Leave a comment