पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार हेक्टरी इतकी मदत मिळणार

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार नवीन मंत्रीमंडळ निर्णय आला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. राज्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे जवळपास १ लाख हेक्टर बाधित झालेले आहे.

ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकरी बांधवाना अतिवृष्टी नुकसानभरपाई म्हणून 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवाना आता नुकसानभरपाई म्हणून आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

संबधित यंत्रणेने लवकरात लवकर त्यांचे पंचनामे सादर करण्याच्या सूचना देखील या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच हि मदत मिळण्याची शक्यता आहे.

कापूस, मका, तूर इत्यादी पिकांचे या पावसामुळे नुकसान झालेले आहे.

लवकरच नुकसानग्रस्त पिकांचे पंचमाने करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याची हि प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टर पर्यंत पिक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे मंत्री मंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे.

अनेक शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम खात्यामध्ये जमा झालेली असली तरी बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विम्याची अग्रिम रक्कम अजून मिळालेली नाही. मात्र पुढील दोन ते तीन दिवसामध्ये हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment