खुशखबर..! शेतकऱ्यांच्या खात्यात ४६ कोटी पिक विमा जमा होण्यास सुरुवात

शेतकऱ्यांच्या खात्यात ४६ कोटी पिक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

अग्रिम पिक विम्याला विमा कंपनीकडून मंजुरी मिळाली आहे त्यासाठी ४६ कोटी ६९ लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.

वेळेवर पाऊस न झाल्याने नुकसान झालेल्या खरीप पिकाच्या मदतीपोटी वैजापूर तालुक्यातील १० महसूल मंडळातील 1 लाख २० हजार ४६९ शेतकऱ्यांना २ टक्के अग्रिम नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.

यासाठी तब्बल ४६ कोटी ६९ लाख 77 हजार ५१८ रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे

हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला त्यामुळे मक्का कपाशीसह खरीप पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा फाटला बसला आहे.

या हंगामापासून राज्य शासनाने केवळ 1 रुपयात पिक विमा देण्याची घोषणा केली होती त्यानुसार वैजापूर तालक्यातील २ लाख ४५ हजार ७७४ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता.

त्यामुळे या मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पिक विमा मंजूर करण्यात आला होता

शेतकऱ्यांच्या खात्यात ४६ कोटी पिक विमा जमा

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पिक विमा मंजूर झाला असून गेल्या चार दिवसापासून पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाम होण्यास सुरुवात झाली आहे.

पैसे बँक खात्यात जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर धडकल्यावर शेतकऱ्यांनी टी रक्कम काढण्यासाठी बँकेत गर्दी केल्याचे दिसून आले आहे

आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या रक्कमेमुळे दिलासा मिळाला आहे.

मक्का पिकासाठी ६ हजार ८०० तर कपाशीसाठी 9 हजार ३९० रुपये हेक्टरी पिक विमा

वैजापूर तालुक्यातील १० महसूल मंडळातील 1 लाख २० हजार ४६९ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पिक विम्याचे ४६ कोटी ६९ लाख 77 हजार ५१८ रुपये मिळणार आहे.

मक्का पिकला ६ हजार ८०० रुपये तर कपाशी पिकला 9 हजार ३९० रुपये हेक्टरी मिळणार असा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी बातमी पहा

Leave a comment