शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार

खरीप पिक विमा योजनेत २१ दिवसापेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते

हा निकष गृहीत घरून राज्यात १३ तालुक्यातील ५३ मंडळामध्ये पिकाच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करावे असे आवाहन कृषी आयुक्त यांनी दिले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडल्या.

आतापर्यंत ९१ टक्के अर्थात 1 कोटी ३२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहे मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली.

हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यापेक्षा अधिक आहे याचा थेट परिमाण सोयाबीन, कापूस, तूर, भात, या महत्वाच्या पिकावर झाला आहे.

१३ ताकुल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा

राज्यातील १३ तालुक्यातील ५३ मंडळामध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवसा झाला आहे पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेंत राज्याने यंदा एका रुपयात पिक विमा काढला आहे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहे.

त्याचा अहवाल विमा कंपनीला देऊन अधिसूचना काढली आहे.

या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई

  • अकोला
  • नगर
  • अमरावती
  • छत्रपती संभाजीनगर
  • बुलढाणा
  • जळगाव
  • जालना
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • सांगली
  • सातारा
  • सोलापूर

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment