या पात्र शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान मंत्रालयात नियोजन protsahn anudan

protsahn anudan राज्य शासनाच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याची मोठी घोषणा केली आहे त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

आतापर्यत शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान देण्यात आले परंतु तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंतहि अनुदान देण्यात आले नाही.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या वर्षपासून अनेक शेतकरी संघटना आंदोलन करत आहे यावर गुरुवारी मंत्रीमंडळ बैठक बोलावण्यात आली आहे.

मागच्या काही दिवसामध्ये शिरोळ येथे जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आले याबर पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार मंत्री यांच्यावर बैठक घेऊन तोडगा करण्याचे आश्वसन शेतकऱ्यांना दिले आहे.

या संदर्भात पुढच्या दोन दोवसात मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे protsahn anudan

राज्य शासनाकडून २०२७,२०१८,२०१८ या तीन वर्षात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे अशा शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु हजारो शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.

यामध्ये अपात्र शेतकऱ्यांना पात्र करायचे झाल्यास शासन स्तरावर आदेश होणे आवश्यक आहे मंत्रालयात सहकार मंत्री यांनी वेळ दिली असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितली.

या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी रोजी पालकमंत्री कागलमधील घरासमोर आंदोलन केले जाणार आहे.

Leave a comment