या जिल्ह्यात अग्रिम पिक विमा वाटप सुरु पहा सविस्तर माहिती

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा वाटप सुरु झाला आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात सुरुवातीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने व मध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आतापर्यंत पिक विमा वाटप झाला आहे यामध्ये काही जिल्ह्यांना अजून पिक विमा मिळालेला नव्हता त्या जिल्ह्यात आता पिक विमा वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.

या वर्षी शेतकऱ्यांना एका रुपयात पिक विमा भरण्यास मिळाला त्यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या वर्षी पिक विमा भरला आहे त्यांमुळे लाखो शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २१४ कोटी ६२ लाख रुपयाचा अग्रिम पिक विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रिम पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे

अग्रिम पिक विमा वाटप करण्याचे काम पुढील हप्त्यामध्ये पूर्ण होण्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुढे यांनी दिली आहे कृषी मंत्री यांनी पिक विमा कंपनीवर दबाव करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे.

या आदेशाची अंबलबजावणी करत नांदेड जिल्ह्यात पिक विमा कंपनीने पिक विमा वाटप करण्यात सुरुवात केली आहे.

Leave a comment