Land record पोट खराब जमीन म्हणजे काय ? पहा जमिनीचे प्रकार

Land record नमस्कार शेतकरी मित्रानो आपण आज या ठिकाणी पोट खराब जमीन म्हणजे काय या जमिनीचे प्रकार कोणकोणते आहे त्याची माहिती जाऊन घेऊया.

भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे बहुतांश नागरिक हे शेती करतात त्यामुळे देशात शेती हा प्रथम व्यवसाय मानला जातो.

जमिनीमध्ये अनेक प्रकार असतात त्यामध्ये पोट खराब जमीन, शेती करण्यायोग्य जमीन, शेती करण्यायोग्य जमीन कोणती व पोट खराब जमीन कोणती या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र शासने २०१८ मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल म्हणजे जमिनीच्या वापरावर ती निर्बंध व जमीन सुधारणा २०१८ मध्ये सुरु झाली

यामध्ये जमीन सुधारणेनुसार पोट खराब वर्गाखाली येणारी जमीन तुम्हाला कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल व त्या जमिनीचा वापर करून तुम्हाला उत्त्पन्न देखील काढता येईल.

Land record पोट खराब जमिनीचे प्रकार

पोट खराब जमीन वर्ग अ

या जमिनीमध्ये खडकाळ क्षेत्र, नाळे, पडीक जमीन या जमिनीचा समावेश होतो हि जमीन पिक घेण्याच्या कामाची नसते हि जमीन खडकाळ भागात असल्याने त्यामुळे कोणतेही पिक घेणे कठीण असते.

या जमिनीवर नागरिनी वखारी करता येत नाही अशा जमिनीला पोट खराब वर्ग अ म्हंटले जाते.

पोट खराब जमीन वर्ग ब

यामध्ये सार्वजनिक कामाच्या वापरासाठी जमीन राखून ठेवली जाते जसे कि एका शेतातुन्न दुसऱ्या शेतात जाण्यासाठी लागणार रस्ता किंवा नदी नाल्याचे पाणी वाहून नेण्यासाठी केल्या जाणाऱ्या नाल्या.

या जमींवर महसूल आकारणी केली जाते.

पोट खराब जमीन हि शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अडचण आहे करण त्यामध्ये शेतकऱ्यांना न शेती करता येते ना काही दुसऱ्या प्रकारचे काम करता येते.

परंतु तुमची जमीन जर रस्त्याच्या कडेला असेत तर त्या जमिनीमध्ये तुम्ही उद्योगधंदा सुरु करू शकता हा एक या जमिनीचा फायदा आहे.

पोट खराब जमिनीचे नियोजन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. व यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे आणि देशाच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळेल व शेतकरी वर्ग विकसित व विकसनशील व प्रगत होईल.

Leave a comment