namo 2th instalment list केंद्र सरकारच्या पिएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या हप्त्यासाठी निधी हिवाळी अधिवेशन मंजूर करण्यात आला आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत या हप्त्याचे वितरण होईल अशी माहिती देण्यात येत आहे परंतु याबाबत अजून राज्य सरकारने तारीख निश्चित केली नाही. कृषीमंत्री धनंजय मुंडे हे हप्ता वितरणासाठी दिनांक निश्चित करतील. इतर ठिकाणी सांगितलेल्या दिनांकावर विश्वास ठेवू नये. namo 2th instalment list
नमो शेतकरी योजनेच्या अटी सुद्धा पिएम किसान योजनेच्या अटी प्रमाणेच आहेत. ईकेवायसी, बॅक खात्याला आधार लिंक, लॅंड सिडिंग ईत्यादी बाबी पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळतात. तसेच महाराष्ट्र सरकारने (NSMNY) नमो शेतकरी योजनेचे नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्हाला पहिला हप्ता आला का आणि पुढील हप्ता येणार का याचे स्टेटस दाखवले जाईल. नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स कसे चेक करावे याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती पाहुया..