Namo Kisan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनासोबतच राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या
जात असतात केंद्र शासनाकडून पी एम किसान योजना तर नमो शेतकरी महासन्माननिधी योजना नुकतीच राज्य शासनाकडून राबविण्यात
Namo Kisan Yojana आलेली आहे. याची अंमलबजावणी ही सुरू झालेली असून शासन निर्णय देखील प्रसिद्ध झालेला आहे. राज्यात राबवले जाणाऱ्या सीएम किसान योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्या 14वा हफ्त्यासोबतच म्हणजेच १५ जुलै रोजी दिला जाणार असणार अशी माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले या हप्त्याची शेतकरी हे वाट बघत होते परंतु आता सर्व शेतकऱ्यांची ही वाट लवकरच पूर्ण होणार आहे.
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेबरोबरच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्माननिधी योजना लागू केली आहे. यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये, त्यासोबतच नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक तीन टप्प्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान लाभ म्हणून दिले जाणार आहेत. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत २,००० त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत २,००० रुपये असे मिळून 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.