शेतकऱ्यांच्या पिक विम्याची समस्या सुटणार लवकरच टोल फ्री क्रमांक pik vima 2024

pik vima 2024 नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा पिकांचे नुकसान होते. अशावेळी पीकविमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरापाई मिळते. मात्र, प्रत्यक्षात नुकसान झाल्यानंतर विमा मिळविण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांचे उंबरे झिझवावे लागतात.

ज्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेवून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय एक टोल फ्री क्रमांक जारी करणार आहे. या शेतकऱ्यांना पीकविम्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी उपयोग होणार आहे. pik vima 2024

टोल फ्री क्रमांक कधी सुरू होणार?

या योजनेंतर्गत पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यानंतर विमा भरापाईची कधी मिळणार, किती मिळणार याबाबची माहिती देणारी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे विमा भरपाईची वाट पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळेच केंद्र सरकारने येत्या आठवड्यात पीकविम्यासंबंधित समस्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी करणार आहे.

Leave a comment