दोन टक्के व्याज दराने मिळणार पाच लाखांपर्यंत कर्ज असा करा अर्ज

राज्यातील दिव्यांगांची आर्थिक, सामाजिक उन्नती, व्हावी यासाठी शासनाने दोन टक्के व्याज दराने पाच लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्य दिव्यांग गटातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे दिव्यांगांना दोन टक्के व्याज दराने लाखापर्यंत कर्ज दिले जाते.

या योजनेचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती आपला स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरु करू शकता.

दिव्यांगांना ५० हजारापासून पाच लाखांपर्यंत कर्ज मिळणार

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे दिव्यांगाना दोन टक्के व्याज दराने ५० ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे.

  • ५० हजार रुपयाची व्यव्क्तिक थेट कर्ज योजना असून त्याला दोन टक्के वार्षिक व्याजदर आहे
  • ५० हजाराच्या पुढील कर्जासाठी सहा टक्के व्याज दर असून सहा वर्षात कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे कर्ज घेऊन दिव्यांग व्यक्ती किराणा, जनरल स्टोअर, कापड दुकान, झेरोक्स यासह इतर आवडीनुसार व्यवसाय करू शकता.

अर्जा संदर्भात माहिती

कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रासह सामाजिक न्यायभवनातील महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ कार्यालयात अर्ज करावा.

  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • युडीआयडी कार्ड
  • वयाचा दाखला
  • जागेचा पुरावा
  • आधार कार्ड
  • पेन कार्ड
  • नाहरकत प्रमाणपत्र
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
  • केटेशन यादी इत्यादी कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे.

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment