Crop Insurance Claim: आपण पाहिले की राज्यामध्ये 2023 खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडला होता. या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतातील पिके मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमी वरती राज्यात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सर्वेक्षण करून 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान असल्याचे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25 टक्के आगरीन पिक विमा वाटप करण्यात आला होता. व उर्वरित जिल्ह्यातील पिक विमा वाटपास सुरू आहे.
ज्या शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पिक विमा मिळाला होता अशा शेतकऱ्यांना आता 75 टक्के पिक विमा कधी मिळणार याची उत्सुकता लागून आहे. राहिलेला 75 % पिक विमा कधी मिळणार याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सध्या शेतकरी या आशेवर आहेत की उर्वरित 75 टक्के राहिलेला पिक विमा मंजूर होईल, यातच अशी चर्चा होत आहे की हा पिक विमा कधी मंजूर होणार आहे व याचे वाटप कधी होणार आहे.
मंजूर झालेल्या 25% टक्के पिक विम्याची वाटप प्रक्रिया ही सध्या सुरू आहे. व उर्वरित राहिल्या त्या 75 टक्के पिक विम्याची माहिती विमा कंपनी ही जून किंवा जुलै महिन्यात देता असते.
75 % पिक विमा कधी होणार मंजूर (Crop Insurance Claim)
विमा कंपनीने याबाबतची कुठलीही स्पष्टीकरण दिले नाही की 75 टक्के पिक विमा मंजूर कधी होणार. परंतु काही न्यूज द्वारे असे सांगण्यात आले की जून किंवा जुलैमध्ये या 75 टक्के विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.