Crop Insurance पीक विम्याची थकीत रक्कम शेतकऱ्यांना लवकर देण्याचे आदेश

Crop Insurance यावर्षात अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. पीकनुकसानासाठी जाहीर केलेली पीकविम्याची उर्वरित ७५ टक्के रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी भारत कृषक समाजातर्फे महाराष्ट्र चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कमी अधिक पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही पिके साधली नव्हती.

सोयाबीनचे उत्पन्न फार कमी झाले. तुरीचा पहिला बहर पूर्णपणे वाया गेला. पावसाने दगा दिला. शेतकऱ्यांनी वाढलेल्या किमतीत खते, बी- बियाणे, कीटकनाशकांवर भरपूर खर्च केला. यावर्षी मजुरीचा दरही वाढला. शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. Crop Insurance

पीकविमा रक्कमेची २५ टक्के रक्कम आगाऊ दिली होती. आता आपल्या संपूर्ण जिल्हयात ५० पैशांच्या आंत आणेवारी जाहीर झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात शिल्लक असलेली पीकविम्याची ७५ रक्कम लवकरात लवकर जमा करावी अशी मागणी डॉ. मानकर यांनी मुख्यमंत्री, कृषी मंत्री व पीकविमा कंपनीकडे केली आहे.

Leave a comment