अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २०६ कोटी निधी मंजूर या शेतकऱ्यांना मिळणार मदत

राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २०६ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे याचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात मोठे नुकसान केले होते त्यामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २०६ कोटी निधी मंजूर झाला असून वाढीव निकषाने शेतकऱ्यांना हि मदत दिली जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ६४ हजार १९४ शेतकऱ्यांचे 1 लाख ४८ हजार ३६८.४१ हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता.

त्यासाठी २० जानेवारीला २०६ कोटी रुपयाची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली होती.

दोन एवजी तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार

  • अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे
  • याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळा याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
  • तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
  • मात्र नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ मधील अवेळीपाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकाच्या नुकसानीकरिता शासनाने एक जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने दोन हेक्टर एवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment