Crop Insurance खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे, अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीप विमा योजनेत सहभागी झालेल्या दोन लाख २८ हजार ४४१ शेतकऱ्यांपैकी एक लाख २५ हजार ६०० शेतकऱ्यांना ४२ कोटी १३ लाख ९ हजार रुपयांची नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. अजूनही एक लाख २ हजार ८४१ शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतील सहभागासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यानंतर मुदत वाढ करून ती ३ ॲगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. Crop Insurance
तालुकानिहाय शेतकरी संख्या व नुकसानभरपाईचे वाटप (रक्कम लाखांत)
- तालुका — शेतकरी संख्या — रक्कम
- हवेली — १३९१ — १९.२०
- खेड — १५,३३५ — ६,६०.३१
- आंबेगाव — १३,९४४ — ४,२३.६८
- जुन्नर — २७७९३ — १३,८५.८८
- शिरूर — २४,५३३ — ४,९७.२९
- पुरंदर — १३,३०७ — २,५०.००
- दौंड — २७९२ — ५४.२६
- बारामती — १९,४३० — ६,६९.५०
- इंदापूर — ७०७५ — २,५३.७८
- एकूण — १,२५,६०० — ४२,१३.९