आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेलत तर अगदी काही मिनिटांमध्ये आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड कसे करावे हे आपण जाणून घेणार आहोत.
हि संपूर्ण प्रोसेस अगदी सोपी आहे. काही मिनिटात तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता ayushman bharat card download.
आयुष्यमान कार्ड मोबाईलवर डाउनलोड कसे करावे हे जाणून घेण्याआधी जाणून घेवूयात कि आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड मिळाल्यानंतर कोणते फायदे होणार आहे.
हे कार्ड डाउनलोड करण्याआधी तुमचे नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. तुमचे नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे मोबाईलवर कसे पाहावे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आयुष्मान कार्ड डाउनलोड केल्यानंतर मिळणारे फायदे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत तुम्ही जर पात्र झालात तर तुम्हाला मोफत उपचार मिळू शकतात. प्रधान मंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत एकूण 34 आजारावर मोफत उपचार केले जातात.
त्यामुळे तुम्ही जर ग्रामीण भागातील नागरिक असाल आणि तुमच्याकडे उपचारासाठी पैसे नसतील तर नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेवू शकता.
ग्रामीण भागातील नागरिकांना जर आजार झाला आणि तो प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेच्या यादीतील असेल तर त्यावर मोफत उपचार केले जातात. ग्रामीण भागामध्ये नागरिकांकडे दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात.
अशावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड वापरून तुम्ही मोफत उपचार करू शकता. तर आता जाणून घेवूयात कि हे आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे करावे. How to download ayushman bharat card.
Also read this Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान
मोबाईलवर आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत खालीलप्रमाणे
- मोबाईल मधील ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा pmjay.gov.in
- जसे हि pmjay.gov.in हा कीवर्ड टाईप कराल त्यावेळी मोबाईलच्या स्क्रीनवर pmjay ची लिंक येईल. त्या लिंकवर टच करा. वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे टच करा.
- मोबाईल स्क्रीनच्या डाव्या बाजूला top corner ला तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर टच करा.
- portals हा पर्याय शोधून त्या खालील दिसणाऱ्या beneficiary identification system या पर्यायावर टच करा.
- यावेळी मोबाईल स्क्रीनच्या उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा. या ठिकाणी download ayushman card हा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
- Scheme या पर्यायावर टच करताच विविध पर्याय तुम्हाला दिसेल. त्यापैकी PMJAY या पर्यायावर टच करा.
- State या पर्यायावर क्लिक करून महाराष्ट्र हा पर्याय निवडा.
- सर्वात शेवटच्या रकान्यामध्ये आधार नंबर किंवा वर्च्युअल आयडी नंबर टाका.
- नियम व अटी समोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जनरेट ओटीपी या पर्यायावर टच करा.
- आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि वेरीफाय करा.
- जसे हि तुम्ही वेरीफाय कराल त्यावेळी तुमचे ayushman card pdf मध्ये दिसेल. pdf आयकॉनवर क्लिक करताच हे ayushman card तुमच्या मोबाईलमध्ये download होईल.