मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान निधीचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची सूचना आहे. तुम्ही जर PM kisan ekyc केली नाही तर तुम्हाला या निधीचा आता इथून पुढे मिळणार नाही. तर शेतकरी बंधुंनो आता हा मोदीचा हफ्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ekyc करणे खूप आवशयक आहे. हि ekyc कशी करायची याची पूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
PM kisan ekyc शिवाय नाही मिळणार मोदीचा 2 हजार हफ्ता
शेतकरी बांधवांनो तुम्ही तुम्ही कित्येक दिवसापासून पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असाल. तर आता या योजनेचा पुढील हफ्ता हा ekyc केली तरच मिळणार आहे. यासाठी जे शेतकरी या योनेचा लाभ घेत आहे त्या शेतकरी मित्रांना PM kisan ekyc करणे खूप गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया ekyc करण्याची पद्धत. मित्रांनो तुम्हाला जर हा लेख वाचून ekyc करण्याची पद्धत समजली नसेल तर आम्ही सर्वात शेवटी व्हिडिओ लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही हि प्रोसेस करू शकता. तुम्ही हि ekyc अगदी तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता.
PM kisan ekyc मोबाईलवरून करण्याची पद्धत
- तुमच्या मोबाईल मधील वेबब्राउजर उघडा.
- वेब ब्राउजरच्या युआरएल बारमध्ये https://pmkisan.gov.in/ हा web adress टाका आणि सर्च करा.
- जसे हि वरील वेब ॲड्रेस तुमच्या ब्राउजरमध्ये सर्च कराल त्यावेळी PM kisan samman nidhi ची वेबसाईट तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ओपन होईल.
- वेबसाईट ओपन झाल्यावर या पेजला तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे. जसे तुमी खाली स्क्रोल कराल या ठिकाणी तुम्हाला Farmers corner मध्ये eKYC हा पर्याय दिसेल.
- eKYC हा पर्यायावर क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकून सर्च करायचे आहे.
- जसे हि तुम्ही सर्च कराल तेंव्हा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या pm kisan samman nidhi संदर्भातील ekyc releted माहिती दिसेल त्या प्रमाणे तुमचे ekyc करून घ्या.
सीएससी सेंटरद्वारे पीएम किसान इकेवायसी करण्याची पद्धत
- तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये pmkisan.gov.in टाका आणि सर्च करा.
- तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पीएम किसान सम्मान निधीची वेबसाईट ओपन झालेली असेल.
- पीएम किसान सम्मान निधीची वेबसाईट ओपन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला CSC login हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- वरील पर्यायावर क्लिक करताच तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवर Digital Seva web portal ओपन होईल.
- या ठिकाणी तुमचा युजर आयडी पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
- या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी OTP/ Biometric Adhar Authentication या पर्यायावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी pm kisan ekyc प्रोसेस चालू होईल.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ लिंक वर टच करा