बांधकाम कामगार योजना अंतर्गत मोफत जेवण वाटप सुरु

मित्रांनो नोंदणीकृत बांधकामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध बांधकाम कामगार योजना अंतर्गत योजनांचा लाभ मिळतो. यामधील एक योजना म्हणजेच मध्यान्ह भोजन योजना होय आणि याच योजनेची अमलबजावणी आता गावोगावी होण्यास सुरुवात झालेली आहे.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एकूण २९ योजनांचा लाभ मिळत होता परंतु आता आणखी तीन योजनाचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आल्याने हा आकडा 32 एवढा झालेला आहे.

बांधकाम कामगार योजना अंतर्गत मोफत मध्यान्ह भोजन योजना

यातील एक योजना म्हणजे मध्यान्ह भोजन होय. मध्यान्ह भोजन योजनेचा कामगारांना विशेषतः ग्रामीण भागातील कामगारांना खूप लाभ मिळत आहे. कामाच्या ठिकाणी भोजन मिळत असल्याने अनेक कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य नर्माण होत आहे.

वरील योजनेव्यतिरिक्त इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

मित्रानो तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल परंतु तुम्ही अजूनही तुमची नोंदणी केली नसेल तर लगेच ऑनलाईन नोंदणी करून घ्या आणि जर तुम्हाला ऑफलाईन नोंदणी करायची असेल तर pdf स्वरूपातील अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढा अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर संबधित व्यक्तींना तो सादर करून द्या..

ऑफलाईन अर्ज नमुना तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा किंवा टच करा.

बांधकाम कामगार pdf अर्ज

या भोजनाचे स्वरूप बघा

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येणार आहे. या आहारात खालील प्रमाणे पदार्थ असतील.

रोटी.

दोन भाजी.

डाळ.

भात.

इतर आहार.

मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना बऱ्याच सरकारी योजनांची माहिती हि मिळत नाही तरी शासनाच्या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आम्ही WhatsApp आणि telegram group बनवेला तुम्ही खालील लिंक ला टच करून आमच्या group मध्ये सामील व्हा.

WhatsApp group

telegram group

2 thoughts on “बांधकाम कामगार योजना अंतर्गत मोफत जेवण वाटप सुरु”

Leave a comment