नवीन हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडणार

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर खबर नवीन हवामान अंदाज ८ जून ते १३ जून रोजी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. असा अंदाज सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीची कामे आटोपली देखील आहे. आता वाट आहे ती फक्त पाऊस कधी पडेल याकडे.

नवीन हवामान अंदाज हवामान तज्ञ पंजाब डख

अशातच महाराष्ट्रील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी ८ जून ते १३ जून रोजी ठिकठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतीची तयारी अजूनदेखील केली नसेल तर लगेच करून घ्यावी.

बंजाब डख यांचे हवामान अंदाज आजपर्यंत अचूक आलेले आहेत. त्यांनी जरी ८ जून ते १३ जून रोजी ठिकठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. सरकारी हवामान अंदाज पोर्टलवर देखील ८ जून रोजी मध्य मराठवाडामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

आमच्याशी कनेक्ट व्हा

यावर्षी खूप चांगला पाऊस असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे आणि हि नक्कीच शेतकरी बांधवांसाठी चांगली बातमी आहे. पाऊस चांगला पडणार हि शक्यता सरासरीनुसार वर्तविण्यात आलेली असते. त्यामुळे कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी देखील होऊ शकते.

अनुदानावर बियाणे हवे असल्यास तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन बियाणेसाठी अर्ज करता येते. अर्ज केल्यानंतर तुम्हाला संदेश येते आणि मग तुम्हाला ५० टक्के किंवा शासनाच्या निर्धारित अनुदानानुसार काही रक्कम माफ करून बियाणे दिले जाते.

बियाणे अनुदान योजना 2022 ऑनलाइन अर्ज सुरु.

महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्यासंदर्भातील व्हिडीओ बघा

पंजाब डख यांनी पावसाचा हवामान अंदाज वर्तविलेला व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a comment