शेतकरी बंधूंनो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषदेच्या वतीने मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक असाल तर एमजी लगेच करा. आता तुमचा प्रश्न असेल की अर्ज कसा करायचा आणि कुठ करायचा? याचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
जालना जिल्हा परिषदेच्या वतीने मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. दिनांक २२ जून २०२२ रोजी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थींना मिरची कांडप यंत्र अनुदानावर हवे असेल त्यांनी लगेच त्यांचा अर्ज ऑनलाईन सादर करावा.
दिनांक २२ जून २०२२ रोजी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थींना मिरची कांडप यंत्र अनुदानावर हवे असेल त्यांनी लगेच त्यांचा अर्ज ऑनलाईन सादर करावा.
मिरची कांडप मशीन अर्ज सादर करतांना लागणारी कागदपत्रे.
- तहसीलदार किंवा तलाठी यांचे उत्पनाचे प्रमाणपत्र.
- ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
- अर्जदार जर दारिद्ररेषेमध्ये असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.
- यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
- आधार लिंक असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स.
- आधार कार्ड झेरॉक्स.
- अर्जदाराचे सर्व मार्गाने मिळून होणारे उत्पन्न १ लाख २० हजारापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार मागासवर्गीय असल्यास तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडील जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स.
- दिव्यांग असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र.
- अर्जदार स्वयंसहायता बचत गटाचे सदस्य असल्यास स्वयंसहायता बचत गटाचे प्रमाणपत्र.
मिरची कांडप मशीनसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.
- मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://zpjalna.co.in/ हि वेबसाईट सर्च करा.
- वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर विभाग व योजना असा पर्याय दिसेल त्यापैकी योजना या पर्यायावर क्लिक करा.
- स्क्रीनचा उजव्या बाजूला महिला व बालकल्याण विभाग हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- या ठिकाणी मिरची कांडप योजना असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता आणखी दोन लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. एक म्हणजे ऑनलाईन अर्ज लिंक आणि दुसरी म्हणजे pdf डाउनलोड लिंक.
- अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करा आणि त्यानंतर सदरील pdf डाउनलोड करून त्यामध्ये विचारलेली माहिती भरा.
मित्रांनो वरील माहिती वाचून का तुम्हाला कळाले नसेल तर खलील व्हिडिओ