ट्रू व्होटर मोबाईल ॲप च्या माध्यमातून पाहता येणार मतदार यादीत नाव

ट्रू व्होटर मोबाईल ॲप च्या माध्यमातून आता मतदार यादी पाहता येणार आहे , महाराष्ट्र शासनाचे नवीन ॲप आले , असे पहा मतदार यादीत तुमचे नाव. 

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात टू व्होटर ॲप विषयी माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये ही ॲप कसे आहे व आता पर्यंत किती नागरिकांनी या ॲपचा वापर केला. 

मित्रांनो हे एक महाराष्ट्र शासनाचे ॲप आहे या ॲप मध्ये आता मतदार यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदरक यांनी दिली. 

या संदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतथळवर दी. 4 जुलै 2022 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे . 

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

टू व्होटर ॲपच्या माध्यमातून पाहता येणार मतदार यादीत नाव 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अंतिम मतदार यादीत नाव शोधण्यासाठी ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. 

मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक यंत्रणेच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. 

राज्यभरातील विविध 14 महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांत नाव शोधण्याची सुविधादेखील अलीकडे उपलब्ध करून देण्यात आली होती.

त्याचबरोबर आपल्या नावासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असल्यास त्याही या ॲपद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 

हे देखील वाचा : प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज मिळेल १५ ते २० हजारांची आर्थिक मदत

मातदाराला मोबाईल वरून शोधा मतदार यादीत नाव 

ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे मतदारांनी स्वत: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपली नावे शोधली व त्यावरील हरकती आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह स्वत:च नोंदविल्या. 

केवळ तीन ते चार दिवसांत असे आक्षेप नोंदविणाऱ्यांची संख्या 2 हजार 770 इतकी होती. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी या ॲपचा वापर केला.

त्यासाठी जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर फोनमध्ये इन्स्टॉल केले. आता आगामी निवडणुकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांमध्येही या ॲपच्या माध्यमातून आपले नाव शोधता येईल.

हे देखील वाचा : महिला बचत गट कर्ज योजना सुरू पहा किती कर्ज मिळणार.

असे वापरा हे मोबाईल ॲप

ट्रू व्होटर मोबाईल ॲप वापरण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. 

  • प्रथम तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जा आणि तेथे टू व्होटर असा किवर्ड सर्च करा. 
  • प्ले स्टोअर च्या लिस्ट मध्ये तुम्हाला tru voter असे एक app दिसेल ते तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 
  • app चालू केल्यानंतर भाषा निवडा आणि पुढे जा तुमच्या समोर अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध होईल. 
  • त्यामधील  पहिल्याच पर्यायमध्ये तुम्हाला voter list search असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
  • त्यामानंतर मध्ये तुम्हाला आणखी दोन पर्याय दिसलीत एक name wise voter list आणि दूसरा म्हणजे id Card wise voter list तुम्ही यामध्ये दोन्ही प्रकारे voter लिस्ट चेक करू शकता. 
  • या app मध्ये तुम्हाला खूप साऱ्या सुविध उपलब्ध करून देण्यात आल्या जसेकी kyc करणे , मतदान निकल , मदत केंद्र असे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

आशा पद्धतीने तुम्ही हे app वापरुन मतदानासंबंधित विवध माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवू शकता. 

अशाच विविध प्रकारच्या महितीसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

Leave a comment