Free Ration Scheme गरिबांना मोफत धान्य नवीन वर्षाची शासनाकडून भेट.

नमस्कार मित्रांनो गरिबांना Free Ration Scheme मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

केंद्रशासनाच्या या योजनेचा फायदा देशभरातील गोरगरीब नागरिकांना होणार आहे. या निर्णयानंतर दर महिन्याला दोन ते तीन रुपयांमध्ये पाच किल अन्नधान्य दिले जाईल.

yojanakamachi group
yojanakamachi group

पुढील वर्षासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

संदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पियुष गोयल यांनी twitter दिली आहे.

Free Ration Scheme केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्याचे मंत्री पियुष गोयल यांचे खालील ट्वीट बघा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत देशातील गरीब जनतेला जो मोफत अन्यधान्य पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी २ लाख कोटी खर्च येणार आहे. हा खर्च केंद्र शासन उचलणार आहे.

आणखी कामाची योजना अहिल्याबाई होळकर शेळी योजना अर्ज करण्याची तारीख वाढली

गरीब वर्गातील 81.35 कोटी लोकांना केंद्र सरकारने एक प्रकरे हे न्यू इयर गिफ्टच दिलेले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी मोफत अन्नधान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत गरीब जनतेला ३ रुपये प्रतीकिलो दराने तांदूळ तर २ रुपये प्रतीकिलो दराने गहू देण्यात येतो.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये गरीब जनतेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत मोफत धान्य मिळणार असल्याने गरीब जनतेस याचा फायदा होणार आहे.

गरिबांना मोफत धान्य १ जानेवारी २०२३ पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे.

Leave a comment