लॅपटॉप अनुदान योजना अर्ज करणे सुरू असा करा अर्ज

लॅपटॉप अनुदान योजना सुरू झाली असून त्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 30 हजार अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

मागासवर्गीय विद्यार्थ्यंनाच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळणार आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर च्या आधी अर्ज करावा लागणार आहे कारण 31 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

हा अर्ज तुम्हाला समाज कल्याण विभागाकडे करावा लागणार आहे त्या अंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लेपटॉप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे कोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात याची संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

लॅपटॉप अनुदान योजना 30 हजार मिळणार अनुदान

वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना लॅपटॉप व सर्वच प्रवर्गातील अपंग लाभार्थी यांना अर्थसाह्य देण्याचा निर्णय जिल्हा परिषेदेच्या समाज कल्याण विभागाने घेतला आहे.

यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी दिली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस, बीडीएस, बीएलएमएस, तसेच अभियांत्रिकीच्या बिई, बीटेक, पदवी अभ्यासक्रमातील प्रथम वर्गात प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी, एसबीसी, प्रवर्गातील विद्यार्थ्याना हा लाभ मिळणार आहे.

त्यांना समाज कल्याण निधी अंतर्गत लेपटॉप खरेदीसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

यात 80 विद्यार्थ्यंनाचा समावेश असणार असून प्रत्येक लेपटॉपसाठी 30 हजार रुपये अर्थसाह्य असणार आहे.

आणखी कामाची योजना अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

कागदपत्रे काय असेल ?

  • अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतल्याबबत बोनफाईट प्रमाणपत्र.
  • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • बारावी उतीर्ण प्रमाणपत्र.
  • नीट प्रमाणपत्र.
  • बँक पासबूक चे जेरॉक्स.
  • रहिवासी प्रमाणपत्र.
  • आदि कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सादर करावी लागणार आहे.

पात्रता काय असेल ?

  • विद्यार्थ्याने यापूर्वी कोणत्याही योजनेतून लेपटॉप घेतलेला नसावा.
  • विद्यार्थी हा मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.

अर्ज कुठे करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सादर कागदपत्रासह पंचायत समितिमध्ये जाणून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment