Pm Gharkul Yojana Maharashtra अमृत महाआवास अभियान

नमस्कार मित्रांनो Pm Gharkul Yojana Maharashtra अमृत महाआवास अभियाना अंतर्गत 13.60 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे

याची माहिती आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील पुर्णपणे माहिती.

खेडेगावातील नागरिकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरे बांधकामासाठी अनुदान दिले जाते.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

ग्रामीण भागातील अनेक नागरिक हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना घर बांधकाम करणे शक्य नाही

त्यामुळे शासनाकडून घरकुल योजना अंतर्गत अशा लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी सहाय्य दिले जाते.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महराष्ट्रातील सर्व लाभार्थींना घरकुल योजनांचा लाभ मिळणार आहे.

अमृत महाआवास अभियानाद्वारे घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.

आणखी कामाची योजना Salokha Yojana Maharashtra सलोखा योजना महाराष्ट्र सुरू GR जाहीर

Pm Gharkul Yojana Maharashtra गरिबांना मिळणार घरे.

राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार आहेत.

अमृत महाआवास अभियान अंतर्गत नवीन उपक्रम राबवून दर्जेदार घरांची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य शासनाच्या योजनांतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. शिवाय 5.61 लाख घरे प्रगतीपथावर आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये राज्याला आतापर्यंत 14.26 लक्ष उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 13.60 लाख म्हणजेच जवळपास 95 टक्के मंजुरी दिली आहे.

उर्वरित जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मंजूर घरकुलांपैकी 9.48 लाख घरकुले विविध योजनांच्या कृतीसंगमातून पूर्ण झाली आहेत.

घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार

महाराष्ट्र राज्य शासनाच्या आवास योजना जसे कि रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, यशवंत आवास योजना, अटल आवास योजना

या योजनांमधून देखील लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.

यामधील 5.15 लाख घरकुले मंजूर करण्यात आली असून 3.66 लाख घरकुले पूर्ण झाली आहेत.

भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

आजपर्यंत 66 हजार पेक्षा अधिक भूमिहीन लाभार्थींना राज्यामध्ये घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

ज्या लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नाहीत अशा भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अधिकृत माहिती बघा

Leave a comment