Namo Shetkari Mahasnman nidhi पहिला हप्ता या दिवशी जमा होणार

Namo Shetkari Mahasnman nidhi योजना राज्यात नवीन सुरू करण्यात आली आहे त्याचा पहिला हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकणी जाणून घेऊया.

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा २००० रुपयाचा हप्ता ज्या प्रमाणे मिळतो त्याच प्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधीचा देखील मिळणार आहे.

या संदर्भात मंत्रीमंडळ बैठक झाली असून या मंत्री मंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे

त्याची माहिती माहराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य शासनाकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे

शेतकऱ्यांना आता दोन्ही योजणाचे वार्षिक १२००० रुपये मिळणार आहे.

आणखी कामाची योजना Dron Anudan Yojana शेतकऱ्यांना मिळणार ड्रोण खरेदीसाठी अनुदान

Namo Shetkari Mahasnman nidhi

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी

योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यात येईल.

या योजनेतून प्रति वर्ष रक्कम 6 हजार रुपये लाभ  (दर चार महिन्यांनी रु. 2000/- अशी वार्षिक समान तीन हप्त्यात) पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येतील.

पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2 हजार रुपये, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2 हजार रुपये, तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च 2 हजार रुपये.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभा‍र्थींना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली.

संनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील गठित करण्यात येतील.

नमो शेतकरी महासन्मान योजणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शासनाने राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

त्यामुळे या निर्णयाचे शेतकाऱ्याकडून स्वागत केले जात आहे.

आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनाचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना १२००० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.

या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आली आहे.

अधिकृत माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “Namo Shetkari Mahasnman nidhi पहिला हप्ता या दिवशी जमा होणार”

Leave a comment