या जिल्ह्यातील अग्रीम पिक विमा आजपासून रक्कम खात्यावर जमा होण्यास सुरुवात Crop Insurance

Crop Insurance राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली. नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी विमा कंपन्यांनी भरपाई न देण्यासाठी राज्य शासनाकडे अपील दाखल केले होते. (Nandurbar) मात्र राज्य सरकारने विमा कंपन्यांचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानी संदर्भात राज्य शासनाने अधिसूचना काढली होती. या आधी सूचनेवर विमा कंपन्यांनी अंशतः आक्षेप घेतले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील कंपनीने राज्य (Farmer) सचिवांकडे अपील केले होते. अपीलवर सुनावणी करत सचिव यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला काही दुरस्त्या सुचवल्या होत्या. त्या दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्यात आल्यानंतर हे अपील निकाली निघाले आहे.

२५ टक्के अग्रीम

आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांना आग्रिम रक्कम मिळण्यास प्रारंभ होणार आहे. एकीकडे विमाधारक शेतकऱ्यांना २५ अधिक खंड असलेल्या किंवा २१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या असल्याने येथील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. विमाधारकांना २५ टक्के आग्रीम रक्कम मिळणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a comment