दुष्काळी अनुदानाची रक्कम 29650 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात crop insurance scheme

crop insurance scheme गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांचे (Farmers) मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. विभागातील आठही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर

क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने 1214 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र नुकसानभरपाई देताना शासनाने काही नवीन निर्णय घेत मदत थेट ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्याबाबत crop insurance scheme

नियोजन केले होते. दरम्यान तब्बल चार महिन्यानंतर ऑनलाइन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्त ‘पुढारी’ने दिले आहे.

शासनाच्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये बाधित शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने गोळा करण्याचा निर्णय झाल्याने, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याने स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करून मदतीचे वाटप केले. परंतु, इतर जिल्ह्यांनी शासनाच्या सॉफ्टवेअरची प्रतीक्षा केली.

अतिवृष्टी नुकसानभरपाई आकडेवारी…
जिल्ह्याचे नाव अनुदान रक्कम
छत्रपती संभाजीनगर 268 कोटी
जालना 397 कोटी
परभणी 76 कोटी
हिंगोली 16 कोटी
नांदेड 25 कोटी
बीड 410 कोटी
लातूर 19 कोटी

Leave a comment