पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांनी अनुदांसाठी लँड सिडिंग कसे करावे अन्यथा अनुदान मिळणार नाही

लँड सिडिंग : राज्यातील शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्यासाठी शासने 1 जानेवारी १०१९ पासून पीएम किसान योजना सुरु केली आहे या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार तीन समान हप्त्यामध्ये दिले जाते

आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लँड सिडिंग करावे लागणार आहे तेव्हाच अनुदान मिळणार आहे अन्यथा अनुदान मिळणार नाही लँड सिडिंग कसे करावे लागणार या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या आयडीची केवायसी करणे आवश्यक आहे राज्यामध्ये पीएम किसान अंबलबजावणीत काही कामे महसूल विभागाकडे देण्यात आली आहे

कृषी विभागामार्फत पीएम किसान योजनेची केवायसी नवीन लाभार्थी शोधून काढणे त्यांना या योजनेत सहभागी करणे हि सर्व जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची पात्रता काय असेल, मृत्यू पावलेल्या लाभार्थीची खात्री करणे, याचे अधिकार तहसीलदार यांच्याकडे ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्याची खात्री करण्यासाठी तो अर्ज स्थानिक तलाठ्याकडे पाठविला जातो. तिथून २१ रकान्यामध्ये सादर केलेली पूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड केली जाते

ही माहिती तहसील कार्यालयासह कृषी विभागाकडून पोर्टलवर अपलोड केली जाते. ही प्रक्रिया क्लिष्ट नाही, पण लॉग इन मधून लँड अप्रूवल देण्यासह या योजनेत लँड सिडिंगचे अधिकार महसूल विभागाकडे असतात.

पीएम किसान योजनेतर्गत एखाद्या शेतकर्याने आपल्या शेतीचे लँड सिडिंग केले तर त्यालाच अनुदान मिळणार आहे

हे लँड सिडिंगकसे करावे याची लोकांना काहीच माहिती नाही त्याची माहिती जाणून घेऊया.

महसूल विभागाने मंजुरी दिल्यानंतरच लँड सिडिंग करता येते कोणत्या लाभार्थीला मान्यता देने आणि कोणाला कडून टाकणे हे अधिकार महसूल विभागाकडे देण्यात आले आहे.

Leave a comment