सोलार पंपासाठी मिळणार आता ७५ हजार अनुदान असा करा अर्ज solar yojana 2024

solar yojana 2024 सोलार पंपासाठी आता ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे या सोलार पंपाच्या माध्यमातून १२० युनिट वीज तयार होणार आहे त्यामुळे याचा ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वीज ग्राहकासाठी सौर उर्जा योजना सुरु करणार असल्याचे सांगितले

महिन्याला १५० युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना २ किलोवॅट पर्यंतच्या क्षमतेचा सौर पंप मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधनमंत्री सूर्यघर वीज मोफत योजना आणली आहे.

या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ७५ हजारांपर्यंत अनुदान मिळवता येणार आहे. solar yojana 2024

सोलारसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून या योजनेंतर्गत प्रतीग्राहक जास्तीत जास्त ७५ हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे.

एक किलोवॅट क्षमतेच्या सौर पंपामधून दररोज चार युनिट अर्थात दरमाह १२० युनिट वीज तयार होणार आहे त्यामुळे कुटुंबाचे वीज बिल देखील माफ होणार आहे.

या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे.

अशी करा नोंदणी

वीज ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in/ या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोदणी करणे गरजेचे आहे पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल एप्लिकेशन देखील यासाठी उपलब्ध आहे.

यावर आपले नाव नोदणी करून लाभ घेता येणार आहे दरम्यान 13 फेब्रुवारी नंतर रुफ टोप सोलारसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळणार आहे.

तील किलोवॅट क्षमतेची सिस्टम बसवणाऱ्या ग्राहकाला १८ हजार रुपये अधिक अनुदान मिळणार आहे.

Leave a comment