नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे शबरी घरकुल योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात या लेखामध्ये जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. शबरी घरकुल योजनेसाठी नुकताच निधी वितरीत करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
या योजनेचा जी आर बघायचा असेल तर आम्ही या लेखाच्या शेवटी दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता.
हे ही वाचा पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी बघा मोबाईलवर
शबरी घरकुल योजना साठी नियम व अटी.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वत:चे किंवा लाभार्थ्यांच्या कुटुंबियांकडे पक्के घर नसावे.
- या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्रील रहिवासी असावा.
- कमीत कमी १५ वर्षे एवढा कालावधीसाठी लाभार्थी हा महाराष्ट्रात रहिवास करणे गरजेचे आहे.
- लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे गरजेचे आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.
- लाभार्थी किंवा अर्जदार यांच्या एकूण कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे पुढीलप्रमाणे असावी. १) ग्रामीण क्षेत्रासाठी १ लक्ष रुपये. २) नगरपरिषद क्षेत्रासाठी १.५० लक्ष रुपये. ३) महानगर पालिकेसाठी २ लक्ष रुपये.
घरकुल योजना लाभाचे स्वरूप.
- १०० टक्के अनुदान ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिले जाते.
- नगर परिषद भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ७.५० टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
- महानगर पालिका येथील रहिवाशांसाठी १० टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
शबरी घरकुल योजना साठी लागणारी कागदपत्रे
- २ पासपोर्ट फोटो.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- नमुना 8-अ.
- शेतीचा 7/12 उतारा.
- शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला.
- घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र.
- तहसिलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र.
शबरी घरकुल आवास योजनेचा PDF अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.