बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी vihir anudan yojana विहीर अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जणून घेऊया.
राज्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन जिल्हा परिषदेमार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जात आहे.
या योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये, तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करणे बंधनकारक आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदने, विहिरीचे बांधकाम करणे आदि कामासाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येते.
तीन टप्प्यामध्ये हे अनुदान देण्यात येते अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
हे देखील वाचा : Maha Krushi Urja Abhiyan ऑनलाइन अर्ज सुरू
बिरसा मुंडा अंतर्गत मिळणार vihir anudan yojana
अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी यसाठी त्यांना नवीन विहीर खोदणे,
जुनी विहीर दुरुस्ती करणे, विद्युत पंप खरेदी करणे, सोलार पंप बसविणे यासाठी अनुदान मिळते.
त्याच बरोबर तुषार सिंचन संच अथवा ठिबक सिंचन खरेदीसाठी शासन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत ९० टक्के पर्यंत अनुदान देते.
या योजनेचा लाभ घेण्यसाठी ७/१२ व ८अ चा उतारा, जातीचा, उत्पन्नाचा दाखला, कृषी अधिकारी यांचे शिफारस पात्र आदि कागदपत्रे लागणार आहे.
लाभार्थी निवड पद्धत व लाभ अटी
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हि पूर्णतः अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.
शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर प्राप्त अर्जातून लॉटरी पद्धतीने लाभार्थीची निवड केली जाते
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा त्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा अधिक असू नये.
शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एक्कर जमीन असावी अथवा दोन तीन शेतकरी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.
कशासाठी किती अनुदान मिळणार पहा
काम | अनुदान |
नवीन विहीर खोदणे | २,५०,००० रुपये |
जुनी विहीर दुरुस्ती | ५०,००० रुपये |
विद्युत पंप सेट | २०,००० रुपये |
ठिबक सिंचन सेट | ३०,००० रुपये |
तुषार सिंचन | ३०,००० रुपये |
पीव्हीसी खरेदी | ३०,००० रुपये |
एचडीपी पीईप खरेदी | ३०,००० रुपये |
अर्ज कुठे व कसा कराल
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
- या पोर्टलवर नोदणी केल्यानंतर त्या नोदणी नंबराच्या आधारे शेतकरी अन्य विविध योजनेसाठी अर्ज करू शकतो
- महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा