Shabari Gharkul Yojana शबरी घरकुल योजना या योजनेसाठी दोन लाख अनुदान मिळणार असून त्यासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
घरकुल शबरी योजनेंतर्गत आता राज्यातील सर्वसामान्य जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे राज्य शासनामार्फत आता घरकुल बांधकामासाठी दोन लाख अनुदान मिळणार आहे.
राज्यातील गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे म्हणून शबरी घरकुल योजना सुरु करण्यात आली आहे
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे व कुठे करावा लागणार आहे अनुदान किती मिळणार आहे व कोणाला मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती खाली पाहूया.
आणखी कामाची माहिती Rooftop Solar Yojana online application
Shabari Gharkul Yojana
अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंबांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविली जात आहे या योजनेंतर्गत घरकुलासाठी २ ते २.५ लाख रुपये अनुदान मिळते.
राज्यातील अनेक ठिकाणी प्रकल्पातून राबविण्यात येणाऱ्या लाखो घरकुलाचे नियोजन करण्यात आले आहे .
नाशिक जिल्ह्यात कळवण आणि नाशिक असे दोन प्रकल्प कार्यालये असून त्या अनुशंगाने शबरी आदिवासी घरकुल योजना राबविली जात आहे.
महाराष्ट्रात या आदिवासी योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी हि योजना राबविली जात आहे.
तसेच आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी हि योजना खूप लाभदायक आहे व त्यांच्यासाठीच हि योजना राबविली जात आहे.
३६९ चौरस फुट क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हि योजना सुरु करण्यात आली आहे. शहरी, ग्रामीण आणि डोंगराळ भागासाठी घरकुलाचे वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहे .
त्या अनुशंगाने अनुसूचित जमातीच्या लोकांना पक्के घर मिळावे योसाठी शबरी घरकुल योजना राबविली जात आहे.
किती अनुदान मिळेल व कोणती कागदपत्रे लागणार
ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये २ लाख ३२ हजार, डोंगराळ क्षेत्रासाठी रुपये २ लाख ४२ हजार रुपये तर महानगरपालिका क्षेत्रा करिता घरकुल मर्यादा रुपये २ लाख ठेवण्यात आली आहे.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
- वयाचा दाखला
- जॉब कार्ड
- ग्रामसभेचा ठराव
- रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
या ठिकाणी करा अर्ज
कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प किंवा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जमा करावा लागणार आहे नाशिक आणि कळवण असे दोन प्रकल्प जमा करता येणार आहे.